Maharashtra Marathi Daily Mahanayak published special edit on the countrywide celebration of the COnstiturtion Day!Thanks.
सामाजिक न्यायाचा संघर्ष तीव्र करणे गरजेचे ! विशेष संपादकीय ६ डिसेम्बर 2014
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाणदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिवस वर्षोगणिक अधिकाधिक विराट स्वरुप धारण करीत आहे. देशभरातीलकरोडो लोकांच्या हृदयात आपला मुक्तीदाता म्हणून स्थान मिळविलेल्या या महामानवाच्यास्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीवर लाखो लोकांचा जनसागर उसळतो. हा विराटजनसागर कोणत्याही पकारचे आमीष अथवा स्वार्थ यासाठी चैत्यभूमीवर आलेला नसतो.चैत्यभूमीवर येण्यासाठी या जनसमुदायावर कोणीही दबाव आणलेला नसतो. त्यांना कोणीही आमंत्रितकेलेले नसते. या विराट जनसमुदायाला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही आचारसंहिता आखून दिलेलीनसते. तरीही हा जनसमुदाय विशिष्ट शिस्तीत आणि विशिष्ट पद्धतीने आदरभाव व्यक्त करीतआपल्या मुक्तीदात्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतो. चैत्यभूमीवरउसळणाऱया आणि वर्षोगणिक उपस्थितीचे उच्चांक मोडणाऱया या गर्दीविषयी नाके मुरडणारे अनेकजणआहेत. चैत्यभूमीवर लावण्यात येणारे विविध संघटनांचे स्टॉल्स्, भोजनवाटप करणाऱया संस्था-संघटनांचेस्टॉल्स्, पुस्तकांची दुकाने, गायकांच्या सीडी विकीची दुकाने, राजकीय नेत्यांचे मंच,अशासकीय संस्थांनी उभारलेले सेवा देणारे स्टॉल्स् या सर्वांच्या संमिश्र संरचनेतूनमहापरिनिर्वाण दिवसाची एक विशिष्ट पकारची परंपरा विकसित होत आहे. ही परंपरा आंबेडकरी अनुयायांच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य भाग बनतचालली आहे. यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्पवरील अभिवादन यात्रेच्यागुणदोषासह हा दिवस आंबेडकरी अनुयायांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग म्हणून स्विकारलापाहिजे.
एखाद्या दिवसाला जेव्हा सांस्कृतिकजीवनाचा भाग म्हणून महत्व पाप्त होते, आणि एका विशिष्ट समुहाचे व विचारांचे लाखो लोकत्यादिवशी एकत्र येतात, त्यावेळी त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक पकारच्या संस्था, संघटना,नेते, व्यक्ती पुढे सरसावतात. यामध्ये राजकीय पुढारी तसेच या गर्दीवर आधारीत अर्थकारणकरणारे लोक सर्वात अग्रेसर असतात. महाराष्ट्रातीलआंबेडकर अनुयायी बौध्दांच्या सांस्कृतीक जीवनाचे अंग बनलेल्या धम्मचक अनुपवर्तन दिनव महापरिनिर्वाण दिन या बाबतीतही असेच घडत आहे. या सांस्कृतीक दिनांचे होणारे राजकीयीकरणव व्यापारीकरण थोपविण्यासाठी, निदान त्यातील दुष्परिणाम कमी करण्यासाठी पयत्न होणे गरजेचे आहे याविषयी कोणाचेही दुमत नाही.मात्र हे पयत्न नेत्यांना संस्था- संघटनांना, विकेत्यांना आणि गायक मंडळींना दूषणेदेऊन यशस्वी होणार नाहीत. यासाठी समाजाच्या विविध स्तरात कार्यरत असलेल्या संस्था,मंडळे, महिला मंडळे विहारांचे विश्वस्त, बौध्दाचार्य, कर्मचाऱयांच्या संघटना, धम्मसंघटनाइत्यादींच्या पबोधनाची आणि परस्पर समन्वयाची आवश्यकता आहे. हे लक्ष्यात न घेता काहीअतिउत्साही तरुणांच्या संघटनांनी व्हॉटस्अप,फेसबुकयासारख्या सोशल मिडियावरुन जे उपद्व्याप चालविले आहेत ते स्विकारार्ह होउढ शकत नाही.धम्मचक अनुपवर्तन दिन किंवा महापरिनिर्वाण दिन हे एखाद्या तथाकथित चिरगुट कार्यकर्त्याचे,कवीचे, स्वयं घोषित समाजसेवकाचे, नेत्याचे अथवा अन्य कोणाचेही नेतृत्व पस्थापित करण्यासाठीअथवा अशा चमकेश्वरांचा उदो उदो करण्यासाठी आयोजित केले जात नाहीत हे या चमकेश्वर महाभागांनीलक्षात घेणे आवश्यक आहे.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिवसाच्यादोन-चार दिवस आधी इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्यामागणीसाठी मोर्चे काढणे, आंदोलन करणे, ताबा घेणे या ही पकाराला मागील चार-पाच वर्षातउढत आला आहे. बौध्दांच्या कोणीतरी नेत्याने बाबासाहेबांच्या स्मारकाचा आग्रह धरणे,सत्ताधाऱयांनी त्यास आश्वासन देणे, या आश्वासनाच्या पाठ पुराव्यासाठी कोणीतरी पयत्नकरणे व त्याची पसिध्दी करणे हा आता नित्यकम झाला आहे. एकंदरीत समाजापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकेआणि पुतळे उभारणे याशिवाय दुसरा कोणताही कार्यकम उरलेला नाही असे चित्र मागील अनेकवर्षात निर्माण झाले आहे.
कोणत्याही महापुरुषांचे स्मारकउभारणे म्हणजे त्या महापुरुषाच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीस हस्तांतरीत करणे असते.ज्यावेळी विचारांच्या पचार-पसाराची पभावी साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळी सम्राट अशोकांनीत्यांच्या साम्राज्यात बुद्धाच्या विचारांचा पचार व पसार करणारी हजारो स्मारके, शिलालेख,लेणी, स्तंभ, पुतळे, विहारे उभारली. सम्राट अशोकांनी उभारलेल्या या स्मारकांच्या माध्यमातूनबुद्धाच्या तत्वज्ञानाचा पचार व पसार नेपाळ ते रोमन साम्राज्यापर्यंत झाला. हा इतिहासब्राह्मणी तत्वज्ञान पमाण मानणाऱया सत्ताधाऱयांना माहित आहे. यामुळेच हे सत्ताधारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांच्या उभारणीस सातत्याने विरोध किंवा दुर्लक्षकरीत आलेले आहेत. ही बाब फुले-शाहूöआंबेडकरांच्या व बुद्धाच्या अनुयायांनी लक्षात घेणेआवश्यक आहे.
आज देशात व महाराष्ट्रात रा.स्व.संघाची राजकीय शाखाअसलेल्या भाजपाचे राज्य आहे. गुजरात, मध्यपदेश, छत्तीसगड इ. अनेक राज्यांमध्ये गेल्याकित्येक वर्षांपासून भाजपाचे म्हणजेच पर्यायाने रा.स्व.संघाचे सरकार आहे. मात्र रा.स्व.संघज्यांना सर्वांत जास्त पूज्यनीय मानतो, त्या हेडगेवार तसेच गोळवलकर गुरुजी यांचे पुतळेअथवा स्मारके त्या राज्यांमध्ये बहुसंख्येने निर्माण करण्यात आल्याचे दिसत नाही. रा.स्व.संघाचेवैचारिक मार्गदाते असलेल्या गोळवलकर गुरुजींचा संपूर्ण देशात एकही पुतळा नाही. गोळवलकरांचेस्मारक म्हणून रा.स्व.संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात अखंड जळत राहणारी ज्योत स्थापितकरण्यात आली आहे. त्याव्यतीरिक्त इतर कोणतेही स्मारक देशामध्ये कोठेही नाही. हे पहाताफुले-शाहू-आंबेडकरांच्या अनुयायांनी पुतळे, स्मारके व विद्यापीठांची नामांतरे या राजकारणातकितपत गुरफटून घ्यावे याचा विचार केला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीउत्तुंग पतिभा, विद्वत्ता आणि त्यांनी मानवमुक्तीचे केले पचंड कार्य यांचा आदर भारतीयसत्ताधाऱयांना नसला तरी जगातील अनेक देशांनी त्यांची दखल घेतली आहे. आज श्रीलंका, जपान,म्यानमार, यासारख्या देशांमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारके उभी करण्यात येत आहेत.जगामध्ये पतिष्ठीत समजल्या जाणाऱया युरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांचेपुतळे उभारण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजघडीला भारतातील दलितांचे एकनेते, एक व्यक्ती, एक विद्वान एवढ्यापर्यंत सीमीत न रहाता जगातील अनेक मानवसमुहाचेमुक्तीदाते, मार्गदाते म्हणून पतिष्ठीत झाले आहेत. आज त्यांना पाप्त झालेला आदर आणिसन्मान तसेच मुक्तीदाता म्हणून असंख्य मानवसमुहाच्या मनात लाभलेले स्थान पाहता, त्यांचीतुलना येशुख्रिस्त, पेषीत महंमद किंवा मोझेस यासारख्या वंदनीय महापुरुषांशीच होऊ शकते.यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांच्या पुतळ्याच्या अथवा स्मारकाच्याउभारणीच्या मागणीपेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा पचार व पसार अखिलविश्वात कसा करता येईल यासाठी जास्त पयत्न केले पाहिजेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकतृत्वालाआणि व्यक्तित्वाला जागतिक स्तरावर शोषितांचा मुक्तिदाता या स्वरुपात मिळत असलेली मान्यताया देशातील ब्राह्मणवादी सत्ताधाऱयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे डॉ. आंबेडकरांनाएका विशिष्ट जातीसमुदायाचा पुढारी अशी ओळख देण्यासाठी ब्राह्मणवादी सत्ताधारी पयत्नकरीत आहेत. दलितांवरील तसेच आंबेडकर अनुयायीबौध्दांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये अलिकडील काळात झालेली वाढ या पयत्नांचाच एकभाग आहे. आंबेडकर अनुयायी बौध्दांवर ज्यावेळीअत्याचार होतात त्यावेळी हा जनसमुदाय पतिकाराच्या भुमिकेतून रस्त्यावर उतरतो. हा पतिकारमोडून काढण्यासाठी तथाकथित उच्च जातीय व हिंदू धर्मिय दलित जाती एकत्रित येऊन आंबेडकरवादी बौध्दांचे सामाजिक विलगीकरण करु पाहतआहेत. आंबेडकरवादी बौध्दांच्या ऐवजी हिंदू दलितांना अधिक राजकीय सहभाग देणे, शासकीयनोकऱयांमध्ये नियुक्ती, पदोन्नती, जबाबदारीच्या पदावरिल नेमणुका यावेळी आंबेडकरवादीबौध्दांना डावलून त्या ऐवजी हिंदू दलित जातींना पाधान्य देणे यासारख्या मार्गाने बौध्दांवर अलिखित बंधने लादून त्यांची पतिकाराचीभावना समाप्त करण्याचे पयत्न ब्राह्मणवाद्यांनी सुरु केले आहेत. यातुन आंबेडकरवादीबौध्दांमध्ये निराशेची, वैफल्याची आणि अगतिकतेचीभावना तयार होत आहे. ही स्थिती समाप्त करुन सामाजिक न्यायाचा संघर्ष अधिक तीव्र करणेहा निश्चय या महापरिनिर्वाण दिनी करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजलीठरेल!