डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान सरकार विकत घेणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील दोन हजार ५० चौरस फूटांचे निवासस्थान महाराष्ट्र सरकारने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकार ने लंदन स्थित बी.आर. अंबेडकर के उस घर को खरीदने का फैसला किया है, जहां वह साल 1920 में लंदन स्कूल ऑफ इकॉनोमिक्स में पढ़ाई करने के दौरान रहते थे। इसे एक स्मारक-सह-संग्रहालय में तब्दील कर दिया जाएगा। एक अधिकारी ने यहां शनिवार को यह जानकारी दी। वैश्विक अकादमिक सम्मेलन में हिस्सा लेने लंदन गए महाराष्ट्र के शिक्षा मंत्री विनोद तावड़े ने सौदे को अंतिम रूप दिया और वहां शनिवार को इसकी घोषणा की।
मुंबई में एक अधिकारी के मुताबिक, 2050 वर्गमीटर में फैले उस घर का सौदा लगभग 40 करोड़ रुपये में तय होने की उम्मीद है। तावड़े ने लंदन में कहा, ''अप्रैल तक हमने सभी औपचारिकताएं पूरी करने की योजना बनाई है और इसे लोगों के लिए स्थायी संग्रहालय-सह-स्मारक बनाया जाएगा।''
उल्लेखनीय है कि पिछले दिनों ब्रिटेन की फेडरेशन ऑफ अंबेडक्राइट्स एंड बुद्धिस्ट ऑर्गनाइजेशन (एफएबीओ) ने महाराष्ट्र सरकार को एक पत्र लिखकर निजी संपत्ति की 40 करोड़ रुपये में नीलाम होने की सूचना दी थी।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील वास्तव्य ज्या घरात होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे. या बाबतच्या गाठीभेटी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लंडन येथे पूर्ण केल्या आहेत. तावडे हे जागतिक शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी सध्या लंडन दौऱ्यावर आहे.
डॉ. आंबेडकर यांचे १९२१-२२ असे दोन वर्षे लंडन येथील ज्या घरात वास्तव्य होते ते घर घरमालकाने विक्रीस काढले होते. याबाबत बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास या पाठपुरावा करत होत्या. दरम्यान सरकारकडून याबाबत काहीच हालचाली न झाल्याने हे घर इस्टेट एजंटद्वारा विक्रीला काढले गेले होते. सध्या लंडन दौऱ्यावर असलेले शिक्षण मंत्री तावडे यांनी यासंदर्भात संस्थेच्या दास यांच्याशी संपर्क करून व्यवहाराची माहीती घेतली. हे घर सुमारे ३५ कोटी रुपयांनी विकण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दावोस (स्वित्झर्लंड) येथे संपर्क करुन राज्य सरकारने हे घर विकत घ्यावे याबाबतचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तावडे यांनी तातडीने बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तचे अधिकारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब यांच्या त्या निवासस्थानाला भेट दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान राज्य सरकार विकत घेणार असून, त्याचे रूपांतर स्मारकामध्ये केले जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांनी निवास केलेले हे घर मूळ मालकाने ३५ कोटी रुपयांना विक्रीस काढले होते. त्यानुसार हे घर विकत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीला हे घर स्मारक म्हणून जनतेसाठी खुले केले जाणार आहे.
१९२१ ते २२ अशी दोन वर्ष डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य लंडन येथील या घरात होते. हे घर विक्रीस काढले होते. याबाबत बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास पाठपुरावा करत होत्या. जागतिक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडन येथे गेले आहेत. यावेळी तावडे यांनी यासंदर्भात फोरमच्या अध्यक्षा दास यांच्याशी संपर्क साधून व्यवहाराची माहिती घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी तावडे यांनी बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली.
त्यानंतर इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास, तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या घर खरेदीसाठी कायदेशीर आणि परदेशातील खरेदीचे नियम पूर्ण करून २ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.